आपण अनेक प्रकारे आपलं व्यक्तिमत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षण, करियर, व्यवसाय, नाते-संबंध, धन संपत्ती अशा बाहेरील अनेक गोष्टींपासून आपलं अस्तित्व, आपली ओळख स्थापित करण्याच्या प्रयत्नात असतो. तरीही आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय याचा खरोखर, परिपूर्ण उलगडा होत नाही. या व्हीडीयोत, सदगुरू अगदी सोप्या भाषेत आपलं खरं अस्तित्व कसं ओळखता येतं हे सांगत आहेत.